तिरुवनंतपुरम : भारत माझे घर आहे, भारतातच मी अखेरचा श्वास घेईन. माझ्या अस्थी येथेच माझ्या प्रियजनांसोबत मिसळून जातील, असे भावुक उद्गार काढत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. येथील प्रचारसभेत सोनिया गांधी म्हणाल्या की, मला राजकारणावर नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यावर आज काही बोलायचे आहे. मोदी यांनी काँग्रेस आणि विशेषत: माझ्याबाबत केलेल्या विधानाबाबत मला काही सांगायचे आहे. होय, माझा जन्म इटलीत झाला. १९६८ मध्ये इंदिरा गांधी यांची सून म्हणून मी भारतात आले. या देशात मी आयुष्यातील ४८ वर्षे व्यतीत केली आहेत. हाच माझा देश आहे. भारतातील या ४८ वर्षांच्या काळात आरएसएस, भाजपा आणि अन्य काही पक्षांनी नेहमीच माझ्या जन्मठिकाणावरून माझ्यावर अपमानास्पद टीका केली; पण मी प्रामाणिक आई-वडिलांची मुलगी आहे. होय, माझे नातेवाईक इटलीत राहतात. मी या देशातच शेवटचा श्वास घेईन. खोटे बोलून आपल्या विरोधकांना लक्ष्य करणे हा पंतप्रधान मोदी यांचा एकमेव उद्देश आहे.
भारतातच अखेरचा श्वास - सोनिया
By admin | Published: May 10, 2016 4:16 AM