शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ४.५ वर्षांत तब्बल ८४७२ एन्काऊंटर; ३ हजार जण जखमी, १४६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 8:55 AM

योगी सरकारच्या गेल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ८ हजार ४७२ एन्काऊंटरच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये गेल्या ४.५ वर्षांत तब्बल ८४७२ एन्काऊंटरया भागात सर्वाधिक चकमकीच्या घटनाभाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

लखनऊ: योगी सरकारचा कार्यकाळ जवळपास आता पूर्ण होत आहे. काही महिन्यांनंतर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच आता योगी सरकारच्या गेल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ८ हजार ४७२ एन्काऊंटरच्या घटना घडल्या असून, पोलीस आणि कुख्यात गुंडांमध्ये झालेल्या चकमकींदरम्यान ३ हजार गुंड जखमी झाले असून, १४६ जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. तर, याच चकमकींमध्ये १६ पोलीस शहीद झाले आहेत. (last four and half year 8472 encounters and 3000 criminals injured in up yogi govt)

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीनंतर आता राजकारण तापताना दिसत आहे. यावरून विरोधकांकडून योगी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. तर सत्ताधारी योगी सरकार सुशासनाचा दावा करताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातही चार चकमकी पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. 

“५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!”

या भागात सर्वाधिक चकमकी

मार्च २०१७ नंतर या चकमकींमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. मार्च २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये ८ हजार ४७२ चकमकी झाल्या. यामध्ये १४६ जण ठार झाले. तर, ३ हजार ३०२ कुख्यात गुंड या चकमकीत जखमी झाले. तसेच यामध्ये ११५७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सर्वाधिक म्हणजे २ हजार २३९ चकमकी झाल्या. यामध्ये १ हजार ५४७ गुन्हेगार जखमी झाले, तर १६ जण ठार झाले. यानंतर आग्रा भागात १ हजार ८८४ चकमकी झाल्या. यामध्ये २१८ गुन्हेगार जखमी झाले. तर १८ जण ठार झाले. तिसऱ्या क्रमांकावर बरेली येत असून, या भागामध्ये १ हजार १७३ चकमकीत २९९ गुन्हेगार जखमी झाले, तर ७ जण ठार झाले आणि २ हजार ६४२ जणांना अटक करण्यात आली आहे. 

जो बायडन यांचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार

भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी

उत्तर प्रदेशमधील भाजप प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी सरकार क्राइम आणि करप्शन फ्रीचे आश्वासन घेऊन सत्तारूढ झाले होते. या दिशेनेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्य करत असून, गुन्हेगार आणि माफियांविरोधात निर्णायक कारवाई केली जात आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार गुन्हेगारांसह निर्दोषांचेही एन्काऊंटर करत असून, यामुळे सामान्य जनतेमध्ये भयाचे वातावरण असल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला आहे. इतकेच नव्हे, तर मानवाधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने फेक एन्काऊंटर प्रकरणी योगी सरकारला नोटीस बजावली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा