गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यासारखा आवाज जगात कुणाचाच नव्हता, त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. 28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदूर राज्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हेदेखील मराठी आणि कोकणी संगीतकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच लतादीदींवर गाण्याचे संस्कार झाले होते. लता दीदींनी आपल्या कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत.
दीनानाथ मंगेशकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे मूल
लता मंगेशकर या दीनानाथ मंगेशकर यांच्या दुसऱ्या पत्नी शेवंतीच्या अपत्य होत्या. दीनानाथ मंगेशकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नर्मदा होते. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांची धाकटी बहीण शेवंती हिच्याशी लग्न केले होते. स्वतः दीनानाथ यांनी स्वतःच मंगेशकर हे आडनावात जोडले होते. लतादीदींचे जन्म नाव हेमा होते, पण नंतर त्यांच्या वडिलांनी एका नाटकातील स्त्री पात्रावरुन लता असे ठेवले.
1991 पर्यंत 50 हजार गाणी
असे मानले जाते की मेलडी क्वीन लता मंगेशकर यांनी आतापर्यंत 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. यातील काही गाणी त्यांनी परदेशी भाषांमध्येही गायली आहेत. 1974 मध्ये पहिल्यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 25 हजार गाणी गाण्याचा विक्रम लतादीदींच्या नावावर नोंदवला गेला. पणष नंतर हा रेकॉर्ड मोहम्मद रफींच्या नावे झाला. ज्यांनी तोपर्यंत 30 हजार गाणी रेकॉर्ड केली होती. पण 1984 मध्ये गिनीज बुकमध्ये पुन्हा एकदा लता मंगेशकर यांच्या नावावर सर्वाधिक गाण्यांचा विक्रम नोंदवला गेला. 1991 पर्यंत स्वर कोकिळा लता दीदी यांनी 50 हजारांहून अधिक गाणी गायली असल्याचे अनेक स्त्रोतांकडून कळले आहे.
असा होता जीवनप्रवास
- 1927: वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांनी संगीताचे शिक्षण सुरू केले.
- 1942: दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले, नवयुक चित्रपटाचे मालक लता दीदींचे पालक जाले आणि त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला.
- 1942 मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले पण शेवटी ते रिजेक्ट झाले. त्याच वर्षी विनायकने पहिली मंगला गौर या मराठी चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका दिली आणि त्याच चित्रपटासाठी गाणे गाऊन घेतले.
- 1943 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी हिंदीत गाणे गायले - 'माता एक सपूत की, दुनिया बदल दे तू'
- 1945 मध्ये लता मंगेशकर मुंबईत आल्या. यानंतर त्यांनी भिंडी बाजार घराण्याच्या उस्तात अमान अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले.
- 1946 मध्ये बसंत जोगळेकर यांच्या 'आप की सेवा में' या हिंदी चित्रपटासाठी 'पा लागू कर जोरी' हे गाणे गायले होते.
- 1950 पर्यंत लता मंगेशकर देशातील सर्वात लोकप्रिय गायिका बनल्या.
- 1953 मध्ये झांझर चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक झाले.
- 1962 मधील ‘ओ मेरे वतन के लोगो’ या गाण्याने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले.
पुरस्कार
- 1969मध्ये पद्मभूषण
- 1989मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार
- 1997मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- 1999मध्ये NTR राष्ट्रीय पुरस्कार
- 1999मध्ये पद्मविभूषण
- 1999मध्ये झी सिने लाइफ टाईम अचिव्हमेंट
- 2001मध्ये भारतरत्न
- 2007मध्ये लीजन ऑफ ऑनर
- पाच फिल्मफेअर पुरस्कार