मान्सून यंदा लेट! केरळमध्ये ४ दिवस उशिरा होणार दाखल; ५ जूनला आगमन शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 06:50 AM2023-05-17T06:50:04+5:302023-05-17T06:51:00+5:30
देशात वर्षभरात जितका पाऊस होतो, त्यातील ७० टक्के पाणी दक्षिण-पश्चिम मान्सून कालावधीत बरसते.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी केरळमध्ये दक्षिण- पश्चिम मान्सून चार दिवस उशिरा पोहोचण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरवर्षी १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनची यंदा ५ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याचा अंदाज आहे.
नुकसानग्रस्तांना १० दिवसांत मदत -
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि पुणे विभागांतून राज्य सरकारकडे ३१२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. पावसाने नुकसानीसाठी देण्यात येणाऱ्या मदतीसाठी शास्त्रीय निकषानुसार प्रस्ताव मंजूर करण्यात येतील.
कुठे आहे किती पारा?
बीड ४३.३
मालेगाव ४२.२
जालना ४१.९
नांदेड ४०.६
जळगाव ४०.५
परभणी ४०.३
सोलापूर ४०.१
सांगली ३८.६
मुंबई ३४.४
पुणे ३६.२
नाशिक ३५.५
- ९६% इतका दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस (एलपीए) होऊ शकतो.
केरळमध्ये आगमन (अंदाजित)
२०२१ २९ मे
२०२२ १ जून
२०२३ ५ जून
८० टक्के शेतकरी पावसावरच अवलंबून -
देशात वर्षभरात जितका पाऊस होतो, त्यातील ७० टक्के पाणी दक्षिण-पश्चिम मान्सून कालावधीत बरसते. ७० ते ८०% शेती ही अजूनही पावसावरच अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा २० टक्के वाटा आहे.