लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:31 AM2024-08-20T09:31:31+5:302024-08-20T09:32:34+5:30

UPSC कडून शनिवारी लॅटरल एंट्रीद्वारे 45 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी याविरोधात मोर्चा उघडला. यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला. तर सोमवारपर्यंत यासंदर्भात एनडीएतील घटक पक्षांची नाराजीही समोर आली.

Lateral Entry In UPSC It is a government job, reservation must be there nda parties demand Split in NDA over UPSC recruitment | लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर

लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर


सध्या युपीएससीतील लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावरू देशात राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये 45 वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘लॅटरल एंट्री’द्वारे नियुक्ती करण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवरऱ्यात सापडला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या अधिसूचनेवर केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी एनडीएतील पक्षांतूनही विरोध होताना दिसत आहे. एनडीएतील नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास पासवान)ही या निर्णयाचा विरोध केला आहे. यांच्या मते, कुठल्याही सरकारी भरतीमध्ये आरक्षणाशीची तरतूद असणे आवश्यक आहे. 

याशिवाय, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) नोकरशाहीतील 'लॅटरल एंट्री'च्या समर्थनात दिसत आहे. तसेच, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह अनेक विरोधी पक्षांनीही लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

UPSC कडून शनिवारी लॅटरल एंट्रीद्वारे 45 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी याविरोधात मोर्चा उघडला. यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला. तर सोमवारपर्यंत यासंदर्भात एनडीएतील घटक पक्षांची नाराजीही समोर आली.

'सरकारी नौकरी में आरक्षण होना चाहिए' -
यासंदर्भात PTI सोबत बोलताना एलजेपीचे (रामविलास) अध्‍यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, "कुठल्याही सरकारी नियुक्तीत आरक्षणाची तरतूद असायला हवी. यात कसल्याही प्रकारे किंतु परंतु नाही. खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही आणि जर सरकारी पदांवरही ते लागू केले जात नाही... ही माहिती रविवारी माझ्या निदर्शनास आली आणि हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच, आपला पक्ष अशा प्रकारच्या निर्णयांचे कदापी समर्थन करत नाही."

"विरोधकांना मुद्दा देत आहे सरकार" -
जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी द इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, "आम्ही पहिल्यापासूनच सरकारांना आरक्षण भरण्यासंदर्भात मागणी करत आहोत. आम्ही राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी आहोत. शतकानुशतके लोक सामाजिकदृष्ट्या वंचित असताना आपण योग्यता का मागत आहात? सरकारचा हा आदेश आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. असे करून सरकार विरोधकांना मुद्दा देत आहे. एनडीएला विरोध करणारे लोक याचा दुरुपयोग करतील."

Web Title: Lateral Entry In UPSC It is a government job, reservation must be there nda parties demand Split in NDA over UPSC recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.