पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद यथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगाल सरकारला चांगलेच निशाण्यावर घेतले होते. यानंतर आज (बुधवार) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मता बॅनर्जी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत, 'योगी सबसे बड़े भोगी हैं.' असे म्हटले होते. यानंतर, आता भारतीय जनता पक्षाने ममतांच्या या विधानावर पलटवार केला आहे.
इमामांच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना ममता म्हणाल्या, "योगी मोठ मोठ्या गप्पा करत आहेत. ते सर्वात मोठे भोगी आहेत. कुंभमेळ्यात अनेकांचा जीव गेला. उत्तर प्रदेशात झालेल्या चकमकीत अनेक लोक मारले गेले. योगी लोकांना रॅली काढू देत नाहीत. बंगालमध्ये खूप स्वातंत्र्य आहे." मतांच्या या विधानावर पलटवार करताना, त्यांनी उत्तर प्रदेशातील योगी मॉडेलकडून काही शिकायला हवे, असे भाजपने म्हटले आहे.
दंगेखोरांना पोसतात ममता -यासंदर्भात एनडीटीव्हीशी बोलताना, भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, "योगीजींनी जे काही म्हणाले, ते दंगलखोरांसंदर्भात होते. मात्र, ते ममता बॅनर्जी यांना आवडले नाही, कारण त्या दंगेखोरांना पोसतात. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला दंगलमुक्त केले आहे. यामुळे त्यांचे वक्तव्य निराधार आहे आणि त्या उत्तर प्रदेश मॉडेलमधून खूप काही शिकू शकतात.
याशिवाय बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, "योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये येऊन जनतेला संबोधित करावे. बंगालमधील अराजकतेविरुद्ध बोलल्याबद्दल मी त्याचे आभार मानू इच्छितो. तसेच, राज्यात आल्याबद्दल मी NHRC आणि NCW चे देखील आभार मानतो."
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ? -योगी म्हणाले होते, “दंगेखोरांसाठी लाठी हा एकमेव इलाज आहे. आपण बघू शकता, बंगाल जळत आहे. मुख्यमंत्री गप्प आहेत. त्या दंगेखोरांना शांतीदूत म्हणून संबोधत आहेत. 'लातों के भूत बातों से कहां मानने वाले हैं.' त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली दंगेखोरांना स्वातंत्र्य दिले आहे. सरकार गप्प आहे. अशा अराजकतेवर नियंत्रण असायला हवे.