दि धरमपेठ महिला मल्टिस्टेटच्या नऊ शाखांचा शुभारंभ लवकरच
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
१०बाय३ (फोटो आहे.)
१०बाय३ (फोटो आहे.)-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार डाटा सेंटरचे उद्घाटननागपूर : दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को.ऑप. सोसायटीच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील नवीन नऊ शाखांचा शुभारंभ गुढीपाडव्यापासून टप्प्याटप्याने होणार आहे. त्याचप्रमाणे सोसायटीच्या डाटा सेंटरचे उद्घाटनही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष सारिका पेंडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. १९९४ पासून सुरू झालेल्या दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट सोसायटीचा अल्पावधीतच तीन राज्यात विस्तार झाला आहे. सध्या संस्थेच्या ३० शाखा असून गुढीपाडव्यापासून टप्प्याटप्प्याने नागपूर शहरात वर्धमाननगर, प्रतापनगर, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर व खामगाव, अकोला, पुणे जिल्ह्यात कोथरुड व औंध, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे या नऊ शाखा सुरू होणार आहेत. या शाखांच्या उद्घाटनानंतर संस्थेच्या एकूण ३९ शाखा कार्यान्वित होतील. सध्या संस्थेचे एक हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट असून ते मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचेही पेंडसे यांनी सांगितले.नव्या नऊ शाखांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी महिलांना जास्तीतजास्त कर्ज देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो, असे संस्थेच्या उपाध्यक्ष नीलिमा बावणे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय सल्लागार प्रतापराय हिराणी, एल.आय.सी. संचालक नीलम बोवाडे व सहा. मुख्य व्यवस्थापक चंद्रशेखर वसुले उपस्थित होते.(वा.प्र.)