औष्णिक विजेसारख्या पारंपरिक स्रोतांना असलेल्या मर्यांदाचा विचार करून नवीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीसाठी पुढच्या १५ ते २० वर्षांचा विचार या अर्थसंकल्पातून मांडला गेला आहे. नवीकरणीय ऊर्जेसाठी सुमारे ५ हजार ३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात देशाला नवऊर्जेवर अधिक निर्भर राहावे लागणार, ही बाब ओळखून ही तरतूद करण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्र देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये सर्वोत्तम संशोधन होण्याची आवश्यकता आहे. या केंद्रांना चालना मिळावी, यासाठी ६७४ केंद्रांमध्ये ५० लाख रुपये बक्षीस असलेली स्पर्धा सुरू करण्याची घोषणा.आयकरात तंत्रज्ञानआयकर विभागातील तंत्रज्ञान आणखी अद्ययावत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. ७ मोठ्या शहरांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व करदात्यांचे ‘ई-असेसमेंट’ करण्यात येणार असल्याची घोषणा. आयकर कार्यालय व लोकांचा थेट संपर्क कमी होईल.‘ई-सहयोग’लहान करदात्यांचे हित लक्षात घेऊन ‘ई-सहयोग’ योजना वाढविणार. आयकर परताव्यासंदर्भातील तक्रारींचे निराकरण ‘आॅनलाइन’ पद्धतीनेच करता येणार. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसे वाचणार आहेत.‘पेटंट’ला प्रोत्साहनभारतात विकसित व नोंदणीकृत ‘पेटंट’मधून मिळणाऱ्या जागतिक उत्पन्नावर १० टक्क्यांच्या दराने कर लावण्यात येईल.विज्ञान संस्था नाहीलीकाही राज्यांना राष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संस्था मिळण्याची अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. यांना राष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संस्था मिळण्याची अपेक्षाही पूर्ण झाली नाही.
नवीकरणीय ऊर्जेला चालना
By admin | Published: March 01, 2016 3:40 AM