शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
5
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
6
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
7
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
8
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
9
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
10
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
11
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
12
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
13
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
14
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
15
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
16
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
18
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
19
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
20
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!

त्याच्यात डोकावण्याची तुमची हिम्मत कशी झाली? भर कोर्टात कोर्टात वकिलावर चिडले CJI चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 4:38 PM

सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळालं.

CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर पुन्हा एकदा वकिलाने अशी काही चूक केली की ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश चंद्रचूड भर कोर्टात वकिलावर प्रचंड चिडले. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर युक्तीवाद करताना एका वकिलाने कोर्ट मास्टरांकडे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तपशीलाची फेरतपासणी केल्याचा दावा केला. हे ऐकून सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड संतापले आणि त्यांनी त्या वकिलाला फैलावर घेतलं. सुप्रीम कोर्टात घडलेल्या या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

गुरुवारी सुनावणीदरम्यान,सरन्यायाधीश चंद्रचूड यांना कळले की एका वकिलाने कोर्ट मास्टरसह त्यांनी लिहिलेल्या निकालाची उलटतपासणी केली. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड संतापले आणि त्यांनी पूर्ण कोर्टात वकिलाला फटकारले. आज वकील कोर्ट मास्टरला त्यांच्या निकालाबद्दल विचारत आहेत, उद्या ते पर्सनल सेक्रेटरींनाही विचारतील की सरन्यायाधीशांनी काय करत आहेत, अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संताप व्यक्त केला.

"कमी वेळेसाठी का असेना, मी इथला प्रमुख आहे. पुन्हा या गोष्टी करण्याचा कधी प्रयत्न करु नका. माझे कोर्टातील काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत. मी कोर्टात काय लिहिलंय ते कोर्ट मास्तरांना विचारायची तुमची हिम्मत कशी झाली? कोर्ट मास्तरांची डायरी बघायची हिम्मत कशी झाली? मग उद्या तुम्हीही माझ्या घरी याल आणि माझ्या पर्सनल सेक्रेटरी किंवा स्टेनोग्राफरला विचाराल की मी काय करतोय. वकिलांनी त्यांची सर्व विवेकबुद्धी गमावली आहे का?" असा सवाल  सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला.

यावर वकिलाने सांगितले की, कोर्ट मास्टरच्या डायरीत लवादाची नियुक्ती झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांच्या कोर्ट मास्टरला विचारले, "तुम्ही त्यांना काही बोललात का?" यावर कोर्ट मास्टर सरन्यायाधीशांनी काहीतरी सांगितले. यानंतरही न्यायमूर्ती चंद्रचूड शांत बसले नाहीत. ते पुढे म्हणाले की, "ते काहीतरी वेगळे सांगत आहे. अंतिम आदेश हाच आहे ज्यावर आम्ही स्वाक्षरी करतो. त्यामुळे असे विचित्र कृत्य पुन्हा करू नका."

दरम्यान, न्यायमूर्ती चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. गेल्या आठवड्यातच  सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान Yeah म्हणणाऱ्या एका वकिलाला झापलं होतं. हे काही कॉफी शॉप नाही, मला या 'या, या, या शब्दाची खूप ऍलर्जी आहे. न्यायालयात असे शब्द वापरण्याची परवानगी देता येत नाही, अशा शब्दात सरन्यायाधिशांनी वकिलाला खडसावलं होतं. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय