Karnataka Election Result 2023 : तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:04 PM2023-05-13T12:04:32+5:302023-05-13T12:06:10+5:30
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये सीमाभागातील अथनीचे लक्ष्मण सवदी होते. तर दुसरे हुबळी धारवाडचे ताकदवर नेते जगदीश शेट्टर होते. या दोघांच्या मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे.
सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ
सवदी यांना काँग्रेसने अथनीतून तिकिट दिले होते. तर भाजपाने जेडीएस- काँग्रेसची सत्ता उलथवण्यात मदत करणाऱ्या महेश कुमथळ्ळी यांना तिकीट दिले होते. अथनी मतदारसंघातून मोठी अपडेट हाती आली आहे. लक्ष्मण सवदी यांना 50275 मते मिळाली आहेत. तर महेश कुमथळ्ळी यांना 19766 मते मिळाली आहेत. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार सवदी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. जवळपास ३१ हजार मतांनी सवदी आघाडीवर आहेत. दुसरीकडे जेडीएसचे शशिकांत पडसळगी यांना 464 मते मिळाली आहेत. यामुळे या जागेवर काँग्रेस आणि भाजपातच खरी लढत झाली आहे. सवदी यांना ७० टक्के मते मिळाली आहेत.
भाजपाने देखील ११ विद्यमान आमदारांना घरी बसवून काँग्रेस, निजदमधून आलेल्या काही जणांना तिकीट दिले होते. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना जोरदार धक्का बसला आहे. शेट्टर यांना 27750 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे महेश तेंगिनकाई यांना 59205 मते मिळाली आहेत. शेट्टर यांनी देखील तिकीट दिले नाही म्हणून भाजपा सोडली होती. तेंगिनकाई यांना ६६ टक्के तर शेट्टर यांना ३० टक्के मते मिळाली आहेत. शेट्टर हे हुबळी धारवाड मध्य या जागेवरून निवडणूक लढवत होते.