शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Karnataka Election Result 2023 : तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:04 PM

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये सीमाभागातील अथनीचे लक्ष्मण सवदी होते. तर दुसरे हुबळी धारवाडचे ताकदवर नेते जगदीश शेट्टर होते. या दोघांच्या मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. 

सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ

सवदी यांना काँग्रेसने अथनीतून तिकिट दिले होते. तर भाजपाने जेडीएस- काँग्रेसची सत्ता उलथवण्यात मदत करणाऱ्या महेश कुमथळ्ळी यांना तिकीट दिले होते. अथनी मतदारसंघातून मोठी अपडेट हाती आली आहे. लक्ष्मण सवदी यांना 50275 मते मिळाली आहेत. तर महेश कुमथळ्ळी यांना 19766 मते मिळाली आहेत. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार सवदी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. जवळपास ३१ हजार मतांनी सवदी आघाडीवर आहेत. दुसरीकडे जेडीएसचे शशिकांत पडसळगी यांना 464 मते मिळाली आहेत. यामुळे या जागेवर काँग्रेस आणि भाजपातच खरी लढत झाली आहे. सवदी यांना ७० टक्के मते मिळाली आहेत. 

भाजपाने देखील ११ विद्यमान आमदारांना घरी बसवून काँग्रेस, निजदमधून आलेल्या काही जणांना तिकीट दिले होते.  दुसरीकडे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना जोरदार धक्का बसला आहे. शेट्टर यांना 27750 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे महेश तेंगिनकाई यांना 59205 मते मिळाली आहेत. शेट्टर यांनी देखील तिकीट दिले नाही म्हणून भाजपा सोडली होती. तेंगिनकाई यांना ६६ टक्के तर शेट्टर यांना ३० टक्के मते मिळाली आहेत. शेट्टर हे हुबळी धारवाड मध्य या जागेवरून निवडणूक लढवत होते. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस