देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी राजपथावर तिरंगा फडकवल्यानंतर देशभरात तिरंगा फडकवण्यात आला. अगदी ग्रामपंचायतीपासून ते मुख्यमंत्र्यांनीही विविध शासकीय कार्यालये, संस्था, शाळा, महाविद्यालयात झेंडा फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा केला. राजकीय नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनीही आपल्या कार्यक्षेत्रात झेंड्याल मानवंदना देण्यासाठी हजेरी लावली होती. हैदराबादमधीलतेलंगणा भवन येथे राज्याचे माजी उपमुख्यंत्री मेहमूद अली यांची अचाकन तब्येत बिघडली.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मेहमूद अली बेशुद्ध पडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मेहमूद अली बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्याजवळी नेतेमंडळींनी त्यांना उचलून घेतल्याचं दिसून येत आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. त्या, व्हिडिओ त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सहकारी नेत्यांनी उचललल्याचं पाहायला मिळत आहे. लोक पाणी मागताना दिसून येत आहे, तसेच त्यांची हात चोळत असल्याचंही दिसून येते.