शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

भारतीय युवकांचा ‘इसिस’कडे ओढा

By admin | Published: November 30, 2014 2:16 AM

इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेकडे भारतीय युवक आकर्षित होत असून, इसिसमुळे देशाच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राजनाथसिंह यांची कबुली : केंद्र सरकार चिंतेत, छळ करण्यासाठी कल्याणच्या तरुणाला अटक केल्याचा इन्कार
गुवाहाटी : सिरिया आणि इराकमध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेकडे भारतीय युवक आकर्षित होत असून, इसिसमुळे देशाच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. 
गुवाहाटी येथे आयबीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 49 व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. पाकिस्तानमधील सरकार पुरस्कृत घटक भारताला अस्थिर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राजनाथसिंह यांनी केला. हे घटक विविध क्लृप्त्या लढवून देशाला हानी पोहोचविण्याचे प्रय} करीत आहेत, असे ते म्हणाले. 
इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी इराकला गेलेला कल्याणचा                  एक तरुण शुक्रवारी मुंबईत परतल्याच्या पाश्र्वभूमीवर राजनाथसिंह यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
या दहशतवादी गटाची स्थापना इराक व सिरियामध्ये झाली असली तरी भारतीय उपखंड या समस्येपासून दूर राहू शकत नाही. त्यांच्या कारवाया समजून घेण्याची गरज आहे. काही भारतीय युवक इसिसकडे आकर्षित होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आम्ही त्याकडे आव्हान म्हणून पाहतो, असे राजनाथसिंह म्हणाले. 
इराकमधील इसिसच्या ताब्यात असलेल्या भागात बेपत्ता झाल्यानंतर मुंबईत परतलेल्या आरिफ माजिद याचा छळ करण्यासाठी त्याला अटक केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट      केले. 
भारतीय उपखंडासाठी कायदा-उल-जेहाद नावाने शाखा उघडण्याची अल-कायदाने केलेली घोषणा हा मोठा धोका असल्याचे नमूद करून राजनाथसिंह पुढे म्हणाले, बांगलादेश, आसाम, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि देशाचा अन्य काही भाग आपल्या नियंत्रणाखाली आणणो हा या दहशतवादी संघटनेचा हेतू आहे; पण भारत असे काही होऊ देणार नाही.  (वृत्तसंस्था)
 
भारतीय मुस्लिम देशभक्त आहेत!
च्भारतात मोठय़ा संख्येने मुस्लिम लोक राहतात. त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या संघटनेत सामील करून इस्लामिक राष्ट्राच्या निर्मितीसाठी लढा दिला जाऊ शकतो, असे अनेक विदेशी दहशतवादी संघटनांना वाटते; परंतु भारतीय मुस्लिम हे सच्चे देशभक्त आहेत. स्वातंत्र्य लढय़ापासून ते आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत आलेले आहेत. 
 
च्भारतीय मुस्लिम नेहमीच देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी लढण्यास तयार असतात आणि त्यामुळेच या दहशतवादी गटांना कधीही यश मिळणार नाही, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
 
गृहमंत्र्यांच्या भाषणादरम्यान सीबीआय संचालकांना लागली डुलकी
च्पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या संमेलनात गृहमंत्री राजनाथसिंग हे दहशतवाद आणि देशाची सुरक्षा या गंभीर विषयावर भाषण देत असताना सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा हे मात्र आपल्या जागेवरच डुलकी घेताना दिसत होते. राजनाथसिंग यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान सिन्हा डुलकी घेताना दिसले. 
 
च्राजनाथसिंग यांचे भाषण पूर्ण झाल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या तेव्हा कुठे सिन्हा जागे झाले. सिन्हा 2 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासापासून दूर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सिन्हा यांना दिले आहेत. आरोपींना मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
 
सिरिया, इराकमध्ये लढून परतणो हे नवे आव्हान..!
गुवाहाटी : भारतीय युवकांचे सिरिया आणि इराकमधील युद्धात भाग घेतल्यानंतर भारतात परत येणो हे देशासाठी नवे आव्हान आहे, असे सांगून पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना देशासाठी नेहमीच धोकादायक असल्याचे मत गुप्तचर विभागाचे (इंटेलिजन्स ब्युरो) संचालक आसिफ इब्राहिम यांनी व्यक्त केले आहे.
गुवाहाटीतील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 49 व्या वार्षिक संमेलनात इब्राहिम बोलत होते. ते म्हणाले, सिरिया आणि इराक हे दोन्ही देश ‘जिहादी’ हिंसाचाराचा नवा धोका म्हणून समोर आलेले आहेत. युवकांचे या देशांमधील युद्धात सहभाग घेतल्यानंतर परत येणो हे देशासाठी नवे आव्हान आहे. 
कल्याण येथील युवक आरिफ माजिद हा शुक्रवारी इराककडून मुंबईत परतला. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने त्याला चौकशीनंतर अटक केली आहे. 
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 73 टक्के मतदान झाले. त्याकडे लक्ष वेधून इब्राहिम म्हणाले, लोक तेथील दहशतवादी गटांना नाकारत असल्याचे हे निदर्शक आहे. 2क्14 मधील हिंसाचाराच्या काही किरकोळ घटना वगळल्या तर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी हे जनता दहशतवादी गटांना नाकारत असल्याचेच निदर्शक आहे. राज्यातील लोकांनी लोकशाहीवर विश्वास दाखविला आहे.
जम्मू-काश्मिरात दहशतवादी गटांचा धोका अद्यापही कायमच असल्याने सुरक्षा दलांना अतिसतर्क आणि दक्ष राहण्याची गरज आहे. इंडियन मुजाहिदीनने नवनवे मॉडय़ुल्स तयार केलेले आहेत.  (वृत्तसंस्था)
 
 
सिरिया व इराकमधील ताज्या घडामोडींमुळे त्यांना बळ मिळाले आहे. सुरक्षा दलांच्या सततच्या दबावामुळेच सर्वात हिंसक असलेली भाकपा (माओवादी) ही संघटना संघटनाही समस्यांनी ग्रस्त झालेली आहे. या संघटनेचे कंबरडे मोडण्यासाठी नवे डावपेच आखण्याची वेळ आली आहे, असे इब्राहिम म्हणाले.
ईशान्येकडील राज्यांमधील काही दहशतवादी संघटना मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर राहिल्याकारणाने सुरक्षेची स्थिती नाजूक बनलेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)