गिरणी कामगारांच्या घरांना गळती
By admin | Published: August 11, 2015 10:11 PM
(शिल्लक)
(शिल्लक)गिरणी कामगारांच्या घरांना गळतीम्हाडाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष : शिर्के कन्स्ट्रक्शनला बांधकाम न देण्याची मागणीमुंबई :मुंबईतील बंद गिरण्यांच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या घरांची लॉटरी म्हाडामार्फत २0१२ मध्ये काढण्यात आली. या लॉटरीत कामगारांना वितरीत करण्यात आलेल्या घरांना गळती लागली असल्याची तक्रार कामगारांनी म्हाडाकडे केली आहे. शिर्के कस्ट्रक्शनकडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने गिरणी कामगारांच्या घरांचे बांधकाम या कंपनीला देण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी गिरणी कामगार म्हाडाकडे करणार आहेत.गिरणी कामगार संघर्ष समितीचे वार्षिक शिबीर नुकतेच केळवा रोड येथे पार पडले. या शिबिरामध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती गिरणी कामगारांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार कामगारांनी यावेळी केला.सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बॉम्बे डाईंग मिलच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्याचे काम रखडल्याने कामगारांकडून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. म्हाडा आणि महापालिकेने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्यापही सुरु केलेली नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे महापालिका आणि म्हाडाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधीत विभागांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णयही कामगारांनी यावेळी घेतला.सर्व गिरणी कामगारांना लवकरात लवकर आणि मुंबईतच घरे उपलब्ध करुन देण्यासाठी एन.टी.सी.च्या जॉईंन्ट व्हेंचरखाली असलेल्या चार गिरण्यांची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळाली पाहिजे. तसेच एन.टी.सी.च्या गैर व्यवहाराची चौकशी करावी आणि गिरण्यांची जागा ताब्यात घेऊन तेथे घरे बांधावित अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्णयही कामगारांनी यावेळी घेतला. या मेळाव्याला गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, राजन दळवी, प्रविण घाग आदी नेते उपस्थित होते.