बीजिंग : भारताच्या अवकाश संशोधनातील प्रगतीमुळे अनेक बड्या राष्ट्रांनाही धडकी बसली आहे. चीनने अवकाश विज्ञानात केलेली प्रगती तर भारतापेक्षा अधिक आहे. तरीही अवकाश तंत्रज्ञानाद्वारे भारत करीत असलेल्या रोजगार निर्मितीचा इतर देशांनी धडा घ्यायला हवा, असा सल्ला चिनी माध्यमांनी दिला आहे.भारताने अत्यंत कमी खर्चात अवकाशात १0४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळे भारतासाठी अवकाश संशोधन क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अवकाश तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत भारताने व्यावसायिक जागा निर्माण केली आहे, असे मायक्रोसॅटेलाइटच्या शांघाई इंजिनीअरिंग सेंटरचे नवे विभाग निर्देशक झांग योंगे यांनी नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)
उपग्रह प्रक्षेपणातून पैसे मिळवणे भारताकडून शिका
By admin | Published: February 21, 2017 1:17 AM