ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 22 - जलिकट्टूवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपात उठवल्यानंतरही तामिळी जनतेचा असंतोष शांत होण्याची काही चिन्हे नाहीत. जलिकट्टूच्या समर्थकांची तामिळनाडूमध्ये जागोजागी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात जागोजागी हा खेळ सुरू आहे. या खेळदरम्यान गंभीर जखमी झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 87 जण जखमी झाल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. बैलाने शिंगे खुपसल्याने किंवा त्याच्या पायाखाली येऊन चिरडले गेल्यामुळे एकूण सर्वजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री पनीरसेल्वम अलनगनल्लुर गावात जलिकट्टूचं उद्घाटन करण्यास आले असता त्यांना तामिळी जनतेनं हुसकावून लावलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी मदुराईमध्ये जलिकट्टूला पाठिंबा दर्शवण्यासंदर्भातील कार्यक्रम रद्द केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमधल्या मरिना बीचवर जलिकट्टूच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात जनता उतरली होती.