पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करताना अच्छे दिवस तर सोडा आमचे जुने दिवस तरी परत आणा, असा टोला पंतप्रधानांना लगावला आहे. नितीशकुमार यांनी शनिवारी टिष्ट्वट करून मोदींच्या ‘अच्छे दिन’वर सडकून टीका केली. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यात वाक्युद्ध शिगेला पोहोचले आहे. एकीकडे भाजप नितीशकुमार सरकारचा विकासाचा दावा फेटाळून लावत आहे, तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव-नितीशकुमार ही जोडगोळी मोदी सरकारच्या काळा पैसा आणि महागाईसह सर्व मुद्यांवर प्रहार करीत आहे. सातत्याने निर्यातीत घट होत असून, तिने वर्षभरातील नीचांक गाठला आहे. परिणामी, महागाई प्रचंड वाढली आहे. तेव्हा मोदींनी अच्छे दिन सोडा; पण आमचे जुने दिवस तरी परत आणावेत, अशी टीका संजद नेत्याने केली.शत्रुघ्न : सभा रद्द झाल्याने नकारात्मक संदेशपाटणा : भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणत भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा रद्द करण्यात आल्याने नकारात्मक संदेश जात असल्याचे म्हटले आहे.पक्षाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे सिन्हा नाराज असून पक्षावर कुरघोडीची एकही संधी ते सोडत नाहीत. यापूर्वीही त्यांनी पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्ये केली आहेत.बिहारमध्ये पंतप्रधानांच्या आणखी सभा होणार -भाजपनवी दिल्ली : बिहारमध्ये पंतप्रधानांच्या जास्त सभा न घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्याच्या वृत्ताचा पक्षाने इन्कार केला असून, त्यांच्या आणखी सभा होतील, असे जाहीर केले आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, मोदी आणखी १३ सभा घेणार आहेत. मोदी हेच आमचे सर्वांत मोठे यश आहे. प्रचाराकडे अद्यापही पाठचपाटणासाहिब मतदारसंघाचे खासदार असलेले सिन्हा यांनी काही संकटे आणि निवडणूक समस्या असतानाही भाजपा विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करील, असा विश्वास व्यक्त केला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी अद्याप प्रचारास सुरुवात केलेली नाही. यापूर्वी त्यांनी डाळीच्या वाढत्या किमतींवर चिंता व्यक्त करून यावर नियंत्रणाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
‘अच्छे’ सोडा, जुने दिवस तरी परत आणा
By admin | Published: October 18, 2015 2:13 AM