पाटणा : रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा चित्रविचित्र घटनांना सामोरे जावे लागते. पण बिहारमधील बक्सर येथे घडलेली घटना अजबच म्हणावी लागेल. स्टेशनवर गाडी आल्यानंतर मोटरमन महाशय आंघोळ आणि जेवणासाठी घरीच निघून गेले होते. त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहनत करावा लागला. तब्बल दोन तासांनी मोटरमन महाशय आले आणि त्यानंतर ट्रेन सुरू झाली. पाटण्याहून निघालेली ही ट्रेन मुगलसरायला चालली होती. सकाळी १0 वाजून ५५ मिनिटांनी ट्रेन बक्सर स्थानकावर पोहोचली, पण त्यानंतर सिग्नल होऊ नही २0 मिनिटे झाली तरी ती सुटण्याचे नाव घेईला. मागून दुसरी ट्रेन यायची असल्याने या ट्रेनने ट्रॅक मोकळा करावा, अशी घोषणाही करण्यात आली. पण मोटरमन एम. के. सिंह याचा काही पत्ता लागेना. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही वेळानंतर कळले की, हे मोटरमन महाशय आंघोळ करायला आणि जेवणासाठी घरी गेले असून, त्यानंतरच ते येतील. स्टेशन मास्तरांनी तशी चक्क अनाऊंसमेंटच केली. तब्बल अडीच तासानंतर म्हणजे १ वाजून १७ मिनिटांनी मोटरमन महाशय परतले आणि मग ट्रेन सुरू झाली. ट्रेनला इतका उशीर का झाला असे पत्रकारांनी त्याला विचारले, तेव्हा त्याने काही न बोलता दरवाजा बंद केला. रेल्वेचे प्रवक्ते आर के सिंह यांनी हे प्रकरण गंभीर असून, चौकशीनंतर संबधित मोटरमनवर योग्य कारवाई केली जाईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था)दुसरा प्रकारगेल्या महिन्यातही बक्सर स्थानकावर असाच प्रकार घडला होता. तेव्हा आपल्या सहाय्यकाला चहा पिता यावा, यासाठी ट्रेन बराच वेळ थांबवून ठेवली होती. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर सहाय्यक घाईघाईने परतला आणि तेव्हा ट्रेन सुरू झाली होती.
ट्रेन सोडून मोटरमन गेले जेवायला
By admin | Published: April 15, 2017 1:09 AM