मणियार विधी महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान
By admin | Published: March 23, 2016 12:11 AM
जळगाव : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात प्रेरणा युवती मंचच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.माधुरी कासट होत्या.
जळगाव : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात प्रेरणा युवती मंचच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.माधुरी कासट होत्या.मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवाकुमार रेड्डी, प्रेरणा युवती मंचच्या समन्वयक प्रा.रेखा पाहुजा, प्रा.अंजली बोंदर उपस्थित होते. कार्यक्रमास प्रा.जी.व्ही. धुमाळे, प्रा.योगेश महाजन, प्रा.ज्योती भोळे, प्रा.मारथी, प्रा.कैलास बोरसे उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.कासट यांनी विद्यार्थिनींना आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या बाबी पाळल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. डॉ.बी. युवाकुमार रेड्डी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.अंजली बोंदर यांनी तर आभार प्रा.रेखा पाहुजा यांनी मानले.