- पोपट पवार लोकमत न्यूज नेटवर्क तिरुवनंतपूरम : केरळमध्ये उन्हाळ्यात विधानसभा निवडणुकीने वातावरण तापले आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेत हाती काही न लागलेल्या भाजपने हिंदुत्वाचे लोण केरळमध्ये आणून चमत्काराची आशा बाळगली असली तरी कित्येक दशके आलटून-पालटून सत्ता गाजविलेली माकपप्रणीत डावी आघाडी आणि काँग्रेसप्रणीत यूडीएफ यांच्यातच घमसान होणार आहे.गेल्या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या डाव्या आघाडीने यूडीएफला पराभूत करून सत्ता ताब्यात घेतली. एलडीएफने १४० पैकी ९१ जागा मिळविल्या, तर यूडीएफला ४७ जागांवर यश मिळाले. भाजपने ९८ जागा लढवल्या; पण एकच विजयी झाला. यंदा मात्र भाजपने अनेक दिग्गजांना पक्षात घेत शिडात चांगलीच हवा भरली आहे.गेल्या काही वर्षांपासून केरळात जातीय ध्रुवीकरण केले जात आहे. केरळध्ये ४७ टक्के जनता ख्रिश्चन व मुस्लीम आहे. ख्रिश्चन काँग्रेस व डाव्यांमध्येच विभागले असले तरी आता ते भाजपकडेही आकृष्ट होत असल्याने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. शबरीमाला प्रकरणावरून भाजपने डावे व काँग्रेसची मते खेचण्याचा प्रयत्न केला.
डावे विक्रम करतील?केरळमध्ये १९८० पासून ४० वर्षे कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्तेवर येता आले नाही. मतदार प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तेचा कौल दुसऱ्या पक्षाच्या हाती देतात. ही परंपरा डावी आघाडी दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन खंडित करणार का, याकडे लक्ष आहे.
गेल्या वेळचे बलाबलडावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) : माकपा : ५८, भाकप : - १९, जनता दल (सेक्युलर) : ३, राष्ट्रवादी : २, अपक्ष - ५, काँग्रेस (सेक्युलर) - १, केरळ काँग्रेस (बी) - १, एनएससी - १, सीपीएम - १,संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) : काँग्रेस-२२, मुस्लीम लीग - १८, केरळ काँग्रेस (मणी) - ६, केरळ काँग्रेस (जेकब) - १