शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

एकाच छत्राखाली डाव्यांची एकजूट?

By admin | Published: May 18, 2016 4:22 AM

कम्युनिस्ट आणि डाव्या पक्षांना एकाच छत्राखाली पुन्हा एकजूट केले जावे.

हैदराबाद : कम्युनिस्ट आणि डाव्या पक्षांना एकाच छत्राखाली पुन्हा एकजूट केले जावे. एकाच झेंड्याखाली आलेल्या या पक्षांचे विलीनीकरण नव्हे, तर एकत्रीकरण असावे, असे सांगत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नव्याने आघाडीचा नारा दिला आहे.कम्युनिस्ट चळवळीचे पुन्हा एकत्रीकरण केले जावे. ते विलीनीकरणापेक्षा वेगळे असेल. विलीनीकरण म्हणजे एक पक्ष दुसऱ्यात विलीन होणे होय, असे भाकपचे सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९६४मध्ये कम्युनिस्टांमध्ये ज्या आधारावर फूट पडली तो मुद्दा आता विसंगत बनला आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या मोहिमा, धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळेच ते एकाच नावाखाली एकत्र यायला हवे. डाव्या पक्षांचे एकत्रीकरण होईलच याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. मात्र हे उद्दिष्ट गाठण्यासाठी किती वेळ लागेल ते सांगता यायचे नाही. (वृत्तसंस्था)माकपकडून हवा सकारात्मक प्रतिसाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधील मित्रांवर एकीकरण अवलंबून असेल. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी संयमाने प्रतीक्षा करण्याची आमची तयारी आहे. माकपसह डाव्या पक्षांमधील मोठ्या संख्येने कार्यकर्ते चळवळीचे पुन्हा एकत्रीकरण करण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक आहेत. अधिकाधिक संयुक्त मोहिमा आम्हाला एकत्र आणतील. पक्षांमध्ये त्याबाबत स्पष्टता, मतैक्याची गरज आहे. पुन्हा एकत्रीकरण हे सर्व काळासाठी असावे. पुन्हा वेगळे होण्यासाठी आम्ही एकजूट करणार नाही, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.