नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) वसतिगृहाची वाढविलेली फी, वसतिगृहाची वेळ पाळण्याची केलेली सक्ती, विद्यार्थी व अतिथीने जेवण करायला येताना व्यवस्थित पोशाख घालून यावे, असा विद्यापीठाने केलेला नियम या गोष्टींविरोधात टीका करणारे डावे पक्ष व या नियमांचे समर्थन करणारे भाजप सदस्य यांच्यात राज्यसभेमध्ये शुक्रवारी जोरदार खडाजंगी झाली.माकपचे खासदार के. के. रागेश यांनी हा विषय शून्य प्रहरामध्ये उपस्थित केला. नव्या नियमांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.जेएनयूच्या संकुलामध्ये बसविण्यात आलेला, पण अद्याप अनावरण न झालेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तो मुद्दा भाजपचे खासदार प्रभात झा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी एका कार्यक्रमात देशाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या.
जेएनयूमधील फी वाढीवर डावे-भाजपमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:32 AM