शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:00 AM

भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा काँग्रेसलाही फटका

संजीव साबडे

केरळमध्ये मतदार दर पाच वर्षांनी सत्ताबदल घडवून आणतात. यात आतापर्यंत एकदाही खंड पडला नव्हता. पान यंदा चमत्कार घडला. सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला मतदारांनी सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. एवढेच नव्हे, तर विधानसभेच्या १४० पैकी ९० हून अधिक जागा माकप, भाकप आणि मित्र पक्षांच्या पारड्यात टाकल्या आहेत. म्हणजेच स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहेत. यावेळी मतदार आपल्यालाच निवडून देणार, अशी काँग्रेस नेत्यांना खात्री होती. त्यातच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील जनतेने काँग्रेसला भरभरून मते दिली होती.

राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. काँग्रेसचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले होते. त्या निकालांमुळे केरळमध्ये आपली लोकप्रियता वाढली आहे, डाव्यांविषयी जनतेत रोष आहे, असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले. ते दीड वर्षे गाफिल राहिले आणि हा गाफीलपणा आता भोवला. दीड वर्षे संघटना बांधणी केली असती, नेते, कार्यकर्ते सक्रिय राहिले असते, तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. कोरोनाचा संसर्ग सुरुवातीला झाला केरळमध्येच. तेव्हापासून आजपर्यंत डाव्या आघाडीच्या सरकारने, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी खूप चांगले काम केले. संसर्ग रोखण्याकाठी त्यांनी केलेल्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली. 

काँग्रेसला गटबाजी भोवलीn गेल्या सहा महिन्यांपासून केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा गाजतो आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी, राजकारणी व प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले गेले. त्यावरून डाव्या सरकारवर हल्ला चढवणे काँग्रेसला शक्य होते. पण तेही काँग्रेसने केले नाही. राहुल गांधी आपल्याला बहुमत मिळवून देणार या भ्रमात ते राहिले आणि मुख्यमंत्री कोणी व्हायचे यावरून नेत्यांची गटबाजी सुरू झाली.

डाव्यांना फायदा दुसरीकडे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांचे सरकार अधिकाधिक लोकोपयोगी यिजना राबवत राहिले. कोरिया संसर्गाच्या व लॉकडाउनच्या काळात त्यांनी खूपच मदत केली. त्यामुळे लोकांना आपापसात न भांडणाऱ्या डाव्यांचे सरकार भावले. 

शिवाय डावे आणि काँग्रेस यांच्यात मतविभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपला मिळेल, हे विजयन आणून त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारांना नीट पटवून दिले. डाव्यांना दूर करण्यासाठी काँग्रेसला मते देण्याने भाजप वाढण्यापेक्षा आहे तेच बरे आहे, असे मतदारांनी ठरविले. भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा फटकाही काँग्रेसला बसला, असे स्पष्टपणे दिसत आहे.

 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१KeralaकेरळElectionनिवडणूक