ऑनलाइन लोकमत -
गुवाहाटी/ कोलकाता, दि. ४ - पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११पर्यंत पश्चिम बंगालमध्ये ३१ टक्के तर आसाममध्ये १९ टक्के मतदान झाले.
सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून चोख पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील १८, तर आसाममधील ६५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होत असले तरी ११ एप्रिल रोजीही पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघ समाविष्ट केले जाणार असल्यामुळे मतदानाच्या ७ तारखा राहतील. आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असताना आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगाई यांना सत्ता कायम राखणे कसोटीचे ठरणार आहे.
#Visuals from West Bengal: Voting to begin shortly, people wait in long queues outside a polling booth in Purulia pic.twitter.com/ocVEIRF9aO— ANI (@ANI_news) April 4, 2016
Voting to begin shortly for first phase of #Assampolls: People wait in long queues outside a polling booth in Jorhat pic.twitter.com/vhhrrmB2ge— ANI (@ANI_news) April 4, 2016
पुन्हा मीच बनेन मुख्यमंत्री - तरूण गोगोई
दरम्यान आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी जोरहाट येथे मतदानाचा अधिकार बजावला. ' पुन्हा मीच मुख्यमंत्री बनेन' असा विश्वास गोगोई यांनी यावेळी व्यक्त केला.
Jorhat: Tarun Gogoi casts his vote, says 'I will be the Chief Minister' #Assampollspic.twitter.com/ZIsUI4jPsE— ANI (@ANI_news) April 4, 2016