नवी दिल्ली : पाच राज्यांत सहा जागांसाठी गेल्या शनिवारी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारली. मेघालयातील चोकपोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार ब्लुबेल आर. संगमा यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी नॅशनल पीपल्स पार्टीचे फिलीपोल मराक यांचा २५५० मतांनी पराभव करून विजय संपादित केला. केरळात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला मोठा विजय मिळाला. अरुविक्कारा जागेवर काँग्रेसचे के.एस. सबरीनंदन यांनी एलडीएफचे उमेदवार एम. विजयकुमार यांचा पराभव केला. त्रिपुरात सत्ताधारी माकपने प्रतापगड व सुरमा या जागांवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत भाजपचे चंदरसिंग सिसोदिया विजयी झाले. विजयातील मतांचे अंतर मात्र २०१३ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी झाले आहे.
पोटनिवडणुकांत सत्ताधाऱ्यांचा विजय
By admin | Published: July 01, 2015 2:38 AM