नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५ लाख २१ हजारांवर पोहोचली असून, एकूण रुग्णसंख्या ९० लाख ९५ हजारांहून अधिक आहे. सलग बाराव्या दिवशीही सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९३.६९ टक्के झाले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९०,९५,८०६, तर बरे झालेल्यांचा आकडा ८५,२१,६१७ वर पोहोचला आहे. कोरोनामुळे देशात रविवारी ४५,२०९ नवे रुग्ण आढळले व आणखी ५०१ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,३३,२२७ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४६ टक्के इतका कमी आहे. जगामध्ये कोरोनाचे ५ कोटी ८६ लाख रुग्ण असून, त्यातील ४ कोटी ५ लाख रुग्ण बरे झाले, तर १३ लाख ८८ हजार जण मरण पावले आहेत. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी २४ लाख झाली असून, त्यातील ७४ लाख लोक बरे झाले. युरोपातील सर्वाधिक कोरोना रुग्ण फ्रान्समध्ये आहेत.
सर्दी, खोकला, ताप असलेल्यांना घरी थांबण्याची सूचना केली जाईल. १९ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १२,००,००० पेक्षा जास्त लोकांशी केंद्रीय गृह व राज्य आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी संपर्क केला आहे.
शनिवारी २१ नोव्हेंबरला ३,७०,७३० जणांची पाहणी करण्यात आली. बुधवारी हे अभियान संपताना (२५ नोव्हेंबर) कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसण्याची भीती आहे.
महाराष्ट्र व केरळमध्येही दररोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले असले तरी शनिवारी अनुक्रमे ६२ व २५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९२ टक्के असून, दररोज रुग्ण समोर येण्याचा दर ७.५९ टक्के आहे. मृत्यूदर सरासरी १.५८ टक्के असला तरी गेल्या चार दिवसांमध्ये त्यात वाढ दिसू लागली आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ८७९ रुग्ण आढळले.