नवी दिल्ली: फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत निवडणूक रोख्यांत सर्वाधिक योगदान राजकीय पक्षांना दिले आहेच, मात्र त्याबरोबरच कंपनीने दिलेले हे योगदान या काळात कमावलेल्या नफ्यापेक्षा ६ पट अधिक असल्याची माहिती समोर आली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, फ्युचर गेमिंगने या काळात १,३६८ कोटी रुपयांचे योगदान निवडणूक रोख्यांत दिले. मागील ३ वर्षांतील कंपनीचा नफा केवळ २१५ कोटी असल्याचे आढळले आहे. (वृत्तसंस्था)
कंपनी देणगी नफा प्रमाण
- फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल्स सर्व्हिसेस १,३६८ २१५ ६३५%
- क्विक सप्लाय चेन प्रा. लि. ४१० ११० ३७४%
- आयएफबी ॲग्रो इंडस्ट्रीज ९२ १७५ ५३%
- हलदिया एनर्जी लि. ३७७ १,०१३ ३७%
- धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. ११५ ४७६ २४%
- मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. ९६६ ६,३९२ १५%
- बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. १०५ १,२९९ ८%
- बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ११७ १,५३५ ८%
- उत्कल ॲल्युमिना इंटरनॅशनल १४५ २,०२२ ७%
- एस्सेल मायनिंग अँड इंडस लि. २२५ ३,४४० ७%
- नॅटको फार्मा लि. ५७ १,५६० ४%
- एनसीसी लि. ६० १,७०२ ४%
- रश्मी सिमेंट लि. ६४ १,८२० ३%
- मॉडर्न रोड मेकर्स प्रा. लि. ५३ १,६२८ ३%
- टॉरेन्ट पॉवर लि. १०७ ५,०७७ २%
- रॅमको सिमेंट्स लि. ५४ २,५९९ २%
- टॉरेंट फार्मास्युटिकल्स लि. ७८ ४,१२० २%
- रुंगटा सन्स प्रा. लि. १०० ५,६४३ २%
- युनायटेड फॉस्फरस इंडिया एलएलपी ५० २,८३२ २%
- डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि. ८४ ९,३६० १%
- वेदांता लि. ४०१ ४८,३७२ १%
- दिविस लॅबोरेटरिज लि. ५५ ८,०८५ १%
- अरोबिंदो फार्मा लि. ५२ ७,६७१ १%
- जिंदाल स्टील अँड पॉवर लि. १२३ १८,४८२ १%
- भारती एअरटेल लि. १९८ ६५,००० -
- नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लि. ५५ ४९६ -