- राजेश बादलसतराव्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्यांदा बिगर काँग्रेस पक्षाला दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. देशाची लोकशाही आता नवे वळण घेत आहे, असे म्हणता येईल. या अभूतपूर्व जनादेशाने कोणता संदेश दिला आणि त्यातून काय धडा घेता येईल? आधी भाजपबद्दल बोलू या!भाजपच्या अभूतपूर्व विजयाची तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ‘मतदाराचे मत थेट त्याच्या खात्यात जाईल,’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांमध्ये केलेल्या आवाहनाचा विलक्षण परिणाम झाला. स्थानिक उमेदवारावरचा राग आणि नापसंती बाजूला पडली. दुसरे, मोदींना आणखी एक कार्यकाळ दिला पाहिजे, या बाजूने बहुमत पडले. तीन राज्यांतील पराभवानंतर मोदींनी जेव्हा राष्टÑवाद आणि भाजपने सांप्रदायिक ध्रुवीकरणाची कास धरली तेव्हा विकासाचा मुद्दा आणि देशातील गंभीर प्रश्न मागे पडले होते. आता नरेंद्र मोदी यांना ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि पायाभूत संरचना यावर लक्ष द्यावेच लागणार आहे.तिसरी बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘मिलावटी’ आणि ‘महामिलावटी’ पक्ष आघाडी कमजोर करतात, यावर मोदी यांनी आपल्या प्रत्येक सभेत भर दिला आहे. (तथापि, हे शब्द त्यांनी विरोधकांसाठी वापरले होते.) त्यामुळे भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्याची संधी मिळणे, हे आदर्शवत ठरेल. असे झाले तर नितीशकुमार यांच्यासारख्या सहकाºयाने राम मंदिर मुद्द्यावर आक्षेप घेतले तरी त्याचा आदर करण्याचा दबाव असणार नाही. भाजपला आता राम मंदिर, कलम ३७० आणि ३५ ए यासारख्या मुद्द्यांकडेही लक्ष द्यावे लागेल.हे निवडणूक निकाल काँग्रेससाठीही धोक्याचा इशारा ठरले आहेत. हा सर्वात जुना पक्ष परिवर्तनाच्या अवस्थेतून मार्गक्रमण करीत आहे. दीड वर्षापूर्वी एका तरुण नेतृत्वाने या पक्षाची धुरा सांभाळली आहे. काँग्रेसला आपल्या पराभवाची कारणे शोधावी लागतील आणि आपल्या प्राधान्यक्रमाशी देशाच्या प्राधान्यक्रमासोबत जोडावे लागेल. नव्या आणि जुन्या पिढीमधील अंतर्विरोध या निवडणुकीत पाहायला मिळाला. आता नव्या रक्ताला पूर्ण संधी मिळाली पाहिजे. पक्ष संघटनेतील उणिवा आणि दुर्बलतेवर मात करण्यासाठी पाच वर्षे पुरेशी आहेत. एवढेच नव्हे तर संपूर्ण वर्षभर निवडणुकीसाठी तयार असणाºया एका रचनात्मक काँग्रेसची आज गरज आहे.शेवटी, निवडणूक प्रचारात भाषा आणि आक्रोशाची अभिव्यक्ती मर्यादित असली पाहिजे, याकडेही काँग्रेसला लक्ष द्यावे लागेल. जरी भाजपने या बाबींचा अतिरेक केला असला तरी काँग्रेसने त्यापासून दूर राहिले पाहिजे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध भाजपने निंदनीय मोहीम राबविली. भाजपनेच राजीव गांधी यांना ‘चोर’ संबोधले होते. भाजपने अशी असभ्य मोहीम उघडली तेव्हा त्याचे नुकसानच झाले. काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ हा शब्दप्रयोग करायला नको होता. मोदींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचाच होता तर ते इतर अनेक मार्गांनी करता आले असते. हे काँग्रेसच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे.प्रादेशिक पक्षांसाठीही १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धडा देणारे आहेत. जाती आणि पोटजातीच्या समीकरणावर राजकीय पोळी शेकण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. त्यांना आता राष्टÑीय मुद्द्यांवर गांभीर्याने विचारविमर्श करावा लागेल.(राजकीय विश्लेषक)
लोकशाहीतील बदल प्रत्येक पक्षासाठी धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 5:11 AM