रघुनाथ पांडे, नवी दिल्लीअण्णा हजारे यांच्या भूमी अधिग्रहण कायद्याविरोधातील राजधानीतील धरणे आंदोलनाला शेतकऱ्यांनी दोन्ही दिवस पाठ दाखविली, तर दुसरीकडे मंचावर राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवरून नाराजी व्यक्त झाली.भूसंपादन अध्यादेश व या कायद्यातील बदलांना विरोधासाठी अण्णा हजारे व सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय आंदोलन जंतरमंतर मैदानावर पार पडले. या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी पाठ दाखविल्याचे दिसून आले. भारतीय किसान युनियनचे चौधरी हरपालसिंग, एकता परिषदचे पी.व्ही राजगोपाल यांच्यासह उत्तर भारतातील अनेक संघटनांचे नेत्यांनी सहभाग नोंदविला, तरी त्यांचे समर्थक तिकडे फिरकलेच नाीहत. दुपारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले तेव्हा त्यांना युवा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर येण्यास मज्ज्वा केला. शेवटी केजरीवाल यांनी स्टेजपुढील लोकांमध्ये बसून आपला व आपल्या पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी अण्णांना स्टेजवर बसू देण्याची विनंती केली. ती मान्य झाल्यावर त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून स्टेजवर आणले. मनीष सिसोदिया, गोपाल राय हे सुध्दा पाठोपाठ स्टेजवर आले.
आंदोलनाकडे शेतक-यांची पाठ!
By admin | Published: February 24, 2015 11:41 PM