मलाही सांगायचय संस्थानकालीन घाटाचा विकास व्हावा
By admin | Published: December 20, 2015 11:59 PM
भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रक
भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रकारची सोय नाही. या घाटावर शहरातील सांडपाणी केरकचरा जाऊन सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. घाणीमुळे घाटाच्या पायर्या गाडल्या गेल्या आहेत. संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी गवतही मोठ्या प्रमाणात उगवले आहे. संरक्षक कठड्यांचा अभाव, वीज व्यवस्था, बसण्याचीही या ठिकाणी सोय नाही. काही वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्याने घाटाला गतवैभव प्राप्त झाले होते. मात्र, शहरातील नागरिक व नगरपलिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावर संरक्षक कठडे, विजेची तसेच बसण्याची सोय केल्यास व घाट स्वच्छ करून, नीरा नदीतून वाहणार्या पाण्यात नौका विहाराची सुविधा करून पर्यटनदृष्ट्या चालना दिल्यास अनेक नागरिक, आबालवृद्ध याचा फायदा होणार आहे. यामुळे लोकांची सोय होईल तर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या संस्थान कालीन घाटाला गतवैभव प्राप्त होणार आहे. मात्र, त्यासाठी पाठपुरावा करून काम करणे गरजेचे आहे, तरच ते शक्य होणार आहे. ज्ञानेश्वर सावंत-अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ