शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पण, आपण या माणसावर हसुया, मस्करी करुया, राहुल गांधींच्या निर्णयाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 6:10 PM

पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचारसभा सुरू आहेत. या सभांना हजारोंची गर्दी होत आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचारसभा सुरू आहेत. या सभांना हजारोंची गर्दी होत आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एकाच दिवशी १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे आज हा आकडा तब्बल २ लाख ६० हजारांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र, आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचारसभा सुरू आहेत. या सभांना हजारोंची गर्दी होत आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'कोरोनाचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा,' असं आवाहन राहुल यांनी ट्विटद्वारे केलं आहे. (congress leader Rahul Gandhi suspends all his election rallies in West Bengal amid surge in corona cases)

राहुल गांधींच्या या निर्णयाचं काँग्रेससह अनेकांकडून स्वागत होत आहे. मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमे यानेही राहुल गांधींचे ट्टिट रिट्विट करत काँग्रेसला राहुल गांधींच्या निर्णयाचं कौतुक केलंय.  आत्ताच्या काळात निवडणूका येतील जातील... यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल. पण, लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, देशाला आत्ता निवडणुका नकोत तर बेड्स हवेत, औषधं हवीत, ॲाक्सीजन हवाय! जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय ! पण आपण या माणसावर हसुया, मस्करी करूया... मजेत राहुया !, असे ट्विट हेमंत ढोमे याने केलंय. राहुल गांधींनी लोकांच्या जीवाची काळजी करुनच आपला निर्णय घेतल्याचं ढोमेनं म्हटलंय. 

देशात लवकरच लॉकडाऊन?केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते. देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली. त्यामुळे लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत. या तीन टप्प्यात असणारे मतदारसंघ वगळता उर्वरित पश्चिम बंगालचा समावेश देशव्यापी लॉकडाऊनमध्ये असेल, असं सूत्रांकडून समजतं. आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील मतदान पूर्ण झालं आहे. या सर्व राज्यांचे निकाल २ मे रोजी हाती येतील. मात्र तोपर्यंत थांबल्यास देशातील परिस्थिती आणखी भीषण होईल. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील काही भाग सोडल्यास संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबद्दल एकमत झाल्याचं समजतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याmarathiमराठीcinemaसिनेमाElectionनिवडणूक