अंबाला : सीमेवर सध्या निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता राफेलसारख्या अत्याधुनिक विमानांचा हवाई दलामध्ये समावेश करणे आवश्यक बनले होते, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, आमच्या भूमीचे रक्षण प्राणाची बाजी लावून करू, असा कडक इशारा त्यांनी चीनला दिला.
फ्रान्सकडून भारत ३६ राफेल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. त्यातील पाच विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा समारंभ गुरुवारी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर झाला. पूर्व लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेले घुसखोरीचे प्रयत्न व त्यामुळे सीमेवर वाढलेला तणाव यामुळे राफेल विमानांचे हवाई दलात सामील होणे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राजनाथसिंह म्हणाले की, भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राफेल विमाने हवाई दलात दाखल करून आम्ही योग्य तो संदेश दिला आहे.
भारतीय वैमानिक जगात सर्वोत्कृष्ट : महेंद्रसिंह धोनी
05 राफेल विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश झाल्याबद्दल भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने त्या दलाचे अभिनंदन केले आहे. त्याने एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाचे वैमानिक हे जगातील सर्वोत्कृष्ट वैमानिक आहेत.
2000 मिराज विमानांपेक्षा राफेल विमान नक्कीच उत्तम कामगिरी करतील; पण सुखोई ३० ही माझी सर्वात आवडती लढाऊ विमाने आहेत, असेही धोनीने म्हटले आहे.