चला, करुया जलसंवर्धनाचा निर्धार! जागतिक जलदिन : विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन; पाणी बचतीची घेतली शपथ
By admin | Published: March 23, 2016 12:11 AM
जळगाव : पर्यावरणाच्या समस्येमुळे उद्भवलेल्या जलसंकटाचा सर्वांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच जलसंवर्धनासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जलसंवर्धनाचा निर्धार केला पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, अशा प्रकारचा जागर जागतिक जलदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये झाला.
जळगाव : पर्यावरणाच्या समस्येमुळे उद्भवलेल्या जलसंकटाचा सर्वांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच जलसंवर्धनासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जलसंवर्धनाचा निर्धार केला पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, अशा प्रकारचा जागर जागतिक जलदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये झाला.जागतिक जलदिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील संकटांची नांदी लक्षात घेता नागरिकांनी पाणी बचतीची शपथ घेतली.प.न. लुंकड कन्याशाळाकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना भालेराव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी एम.डी. नेमाडे, एस.डी. इंगळे, गणेश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी एस.डी. इंगळे यांनी होळीसाठी झाडांची पाने, पालेभाज्या, फुले तसेच हळदीपासून नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. एम.डी. नेमाडे, साधना भालेराव यांनी पर्यावरण व जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन मानसी उपासनी यांनी केले. आभार आरती बंगाली यांनी मानले.अभिनव विद्यालयजलदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य म्हटली. मुख्याध्यापक सरोज तिवारी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अश्विनी साळुंखे, ज्योती शिंदे, नीता पाटील, संतोष सपकाळे, गुरू बारेला, अनिल जोशी, विष्णू ठाकरे, कुणाल बडगुजर उपस्थित होते.गाडेगावला जलजागृती कार्यशाळाश्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठानतर्फे जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जलजागृती कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी वसुंधराचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक अनिल भोकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर धनाड, सरपंच सुलभा भारंबे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अनिल भोकरे, सागर धनाड यांनी मार्गदर्शन केले.अलफैज उर्दू हायस्कूलजागतिक जलदिनानिमित्त अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी हरित सेनेचे मास्टर प्रवीण पाटील, सुभाष इंगळे, अक्षय सोनवणे, आसिफ पिंजारी, तौसिफ शेख, नवाब शेख, आयेशा खान, वर्षा तडवी, जमीर खान उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.