शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जवानाच्या पत्नीला भेट घेऊ द्या

By admin | Published: February 11, 2017 1:09 AM

सीमा सुरक्षा दलाच्या त्या जवानाच्या पत्नीला त्याला भेटून त्याच्या सोबत दोन दिवस राहू द्यावे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले.

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या त्या जवानाच्या पत्नीला त्याला भेटून त्याच्या सोबत दोन दिवस राहू द्यावे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले. सैनिकांना अत्यंत वाईट दर्जाचे जेवण दिले जाते, असा आरोप समाजमाध्यमातून या जवानाने केला होता. सध्या या जवानाची जेथे नियुक्ती आहे तेथे त्याला त्याची पत्नी भेटू शकेल. त्या जवानाला त्याच्या तक्रारीनंतर सांबा येथे पाठवण्यात आले आहे. न्यायमुर्ती जी. एस. सिस्तानी आणि विनोद गोयल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. त्याआधी अतिरिक्त महाअधिवक्ता संजय जैन यांनी बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव हे कोणत्याही बेकायदा स्थानबद्धतेखाली नसल्याचे व त्यांना जम्मूतील सांबाच्या कालिबारीत असलेल्या ८८ व्या बटालियनमध्ये हलवण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले होते. या माहितीची नोंद घेऊन खंडपीठाने म्हटले की या जवानाच्या पत्नीला आपल्या पतीला धोका आहे अशी भीती वाटत असल्यास तिला व त्यांच्या मुलाला जवानाची भेट घेऊ देण्यास परवानगी द्यावी. आम्ही कोणत्याही शास्त्रात जाऊ नये. जवानाच्या पत्नीला त्याची भेट घेऊ देऊन शंकांचे निरसन झाले पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले.