चंदनाच्या झाडांबाबत वन विभागाला पत्र देणार
By admin | Published: July 04, 2016 12:44 AM
जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून चदनाचे झाडे तोडून नेल्याच्या प्रकरणात वन विभागाला पत्र देण्यात येणार आह. चौकशी अंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौधरी यांचे नागझिरी शिवारात गट नं.१३१ (२) मध्ये शेत आहे. त्यात पंधरा वर्षापूर्वी त्यांनी चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. त्यातील ५० ते ६० झाडे कोणीतरी तोडून नेली आहेत. याबाबत चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलीस वन विभागाला पत्र देवून झाडांची किंमत निित करतील. पंचनामा व चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.