मनपाच्या अर्थविभागाचे जेडीसीसी बॅँकेला पत्र
By admin | Published: November 19, 2015 12:09 AM
जळगाव- महापालिकेच्या अर्थ विभागाने जेडीसीसी बॅँकेला पत्र दिले आहे. पत्रात जेडीसीसी बॅँकेकडून आतापर्यंत घेण्यात आलेल्या कर्जाचे व्याज महापालिकेने कशा पद्धतीने फेडले आहेत. याची माहिती मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपाने जेडसीसी बॅँकेकडून ४९ कोटींचे कर्ज केले होते. त्यानंतर तब्बल १४९ कोटींचे व्याज मनपाने परतफेड केले आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मनपाला मार्च २०१९ पर्यंत दरमहा १ कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जळगाव- महापालिकेच्या अर्थ विभागाने जेडीसीसी बॅँकेला पत्र दिले आहे. पत्रात जेडीसीसी बॅँकेकडून आतापर्यंत घेण्यात आलेल्या कर्जाचे व्याज महापालिकेने कशा पद्धतीने फेडले आहेत. याची माहिती मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपाने जेडसीसी बॅँकेकडून ४९ कोटींचे कर्ज केले होते. त्यानंतर तब्बल १४९ कोटींचे व्याज मनपाने परतफेड केले आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मनपाला मार्च २०१९ पर्यंत दरमहा १ कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. ३० घंटागाड्यांच्या पितळी घंटा गायब जळगाव- आरोग्य विभागाच्या ३९ घंटागाड्यांपैकी ३० घंटागाड्यांच्या पितळी घंट्या गायब झाल्या आहे. मनपा मालमत्ता चोरीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ४०० ग्रॅम वजनाची पितळी घंट्यांची किंमत प्रत्येकी ४०० रुपये असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सिद्ध गोरक्षनाथ जयंतीनिमित्त शोभायात्रा जळगाव- सिद्ध गोरक्षनाथ जयंतीनिमित्त शहरात पालखी सोहळा व शोभायात्रा २३ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. दुपारी ११ वाजता चंद्रकांत माळी यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अरविंद हरताळकर यांनी केले आहे. शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे कार्यक्रम जळगाव- स्वयंस्फूर्ती शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिरोपी नामदेव महाराज जयंती सोहळ्याचा कार्यक्रम २२ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता दादावाडी परिसरातील श्रीराम मंदिराच्या सामाजिक सभागृहात होणार आहे. समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव संजय अहिरराव व अध्यक्ष सुधाकर शिंपी यांनी केले आहे.सेवानिवृत्त कर्मचार्यांची २१ रोजी सभा जळगाव- कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्ती कर्मचार्यांची सभा २१ नोव्हेंबरला दुपारी २.३० वाजता महात्मा गांधी उद्यानात होणार आहे. सभेला अण्णा हजारे यांची उपस्थिती राहणार आहे. एस. टी. महामंडळ, दूध फेडरेशन, ग. स. सोसायटी, कृषि सेवा संघ, बॅँक कर्मचारी व औद्योगिक कर्मचारी व इतर विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वासराव सोनवणे यांनी केले आहे.