शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

LGBTQ Marriage Bhopal: एक भोपाळी, दुसरी नेपाळी! पदरात तीन मुले, पतींना सोडले, दोन्ही महिलांनी लग्न केले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 5:14 PM

LGBTQ Marriage Bhopal: गोविंदपुरा पोलीस ठाण्यात असलेल्या एनर्जी डेस्कच्या माध्यमातून दोन्ही महिलांचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनादरम्यान दोन्ही महिला कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत असल्याचे समोर आले.

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विवाहित असूनही दोन महिलांनी एकमेकांशी लग्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या दोन महिला पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होत्या, त्यांना मुलेही आहेत. एक महिला नेपाळी असून ती शिमल्यात राहते. दुसरी महिला भोपाळची आहे. हा प्रकार नेपाळी संघटनेकडे आल्यानंतर त्यांनी भोपाळ पोलिसांची मदत घेतली. यानंतर भोपाळ पोलिसांनी दोघांचे समुपदेशन करून प्रकरण मिटवले.

या विचित्र प्रेमकथेची सुरुवात शिमल्यापासून झाली. भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी शिमल्याच्या नेपाळी महिलेने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. ही मैत्री इतकी वाढली की दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिमला येथील महिला भोपाळमध्ये राहणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी आली, त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांचे लग्न गाझियाबादमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळी महिलेला दोन मुले आहेत, तर भोपाळमध्ये राहणाऱ्या महिलेला एक मूल आहे. भोपाळमध्ये राहणारी महिला पतीपासून वेगळी राहत होती, तर शिमल्यात राहणारी महिला पतीपासून दूर गेली होती. शिमल्यात महिलेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.नेपाळी संघटनेला याची माहिती मिळताच खळबळ उडाली. याप्रकरणी संघटनेने पोलिसांशी संपर्क साधला. महिला गुन्हे शाखेची देखरेख करणाऱ्या एडीसीपी ऋचा चौबे यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून चौबे यांनी तातडीने कारवाई केली. ही नेपाळी महिला निशातपुरा पोलीस स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, महिलेचा पतीही नेपाळी संस्थेमार्फत शिमल्याहून भोपाळला आला.

गोविंदपुरा पोलीस ठाण्यात असलेल्या एनर्जी डेस्कच्या माध्यमातून दोन्ही महिलांचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनादरम्यान दोन्ही महिला कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत असल्याचे समोर आले. दोघींना एकत्र राहून दीड महिना झाला होता. महिला गुन्हे शाखेचे डीसीपी विनीत कपूर यांनी सांगितले की, दोन्ही महिला प्रौढ आहेत आणि त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांनी स्वतः एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यात गुन्हा घडलेला नाही. समुपदेशनानंतर शिमला येथील महिलेने पतीसोबत राहण्यास होकार दिला.

टॅग्स :LGBTएलजीबीटीmarriageलग्न