नवी दिल्ली - सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीने बाजारामध्ये एक जबरदरस्त पेन्शन योजना सुरू केली आहे. १ मार्च २०२२ पासून सुरू झालेल्या सरल पेन्शन योजनेमध्ये एकवेळ गुंतवणूक केल्यावर निवृत्तीनंतर जीवनभर पेन्शन मिळेल.
एलआयसीच्या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार ४० वर्षांवरील अधिक व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकतात. तसेच यातील कमाल वयोमर्यादा ही ८० वर्षे आहे. ही पॉलिसी पती-पत्नी संयुक्तरीत्या खरेदी करू शकताता. ज्यामध्ये ६० वर्षांनंतर पेन्शन मिळू लागेल. पती किंवा पत्नी यांच्यापैकी जे कुणी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत पेन्शन मिळेल. तसेच या दोघांचाही मृत्यू झाल्यावर जमा केलेली रक्कम ही नॉमिनींना परत केली जाईल.
पेन्शन प्लॅन खरेदी करणाऱ्यांना कंपनीकडून रक्कम जमा करण्यासाठी चार पर्याय देण्यात आले आहेत. तुम्ही दरमहा पेन्शन घेऊ शकता किंवा ही रक्कम तिमाही सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेऊ शकता. या योजनेंतर्गत तुम्हाला किमान एक हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाईल. तर याची कमाल मर्यादा नाही आहे. तुम्ही जेवढ्या अधिक रक्कमे प्लॅन खरेदी कराल तेवढी अधिक पेन्शन मिळेल.
या पॉलिसीसाठी कंपनीने बनवले पाच प्राईस बँड - सर्वात कमी रकमेचा विमा प्लॅन २ रुपयांपेक्षा खाली येईल- दुसरा प्राइस बँड २ लाख ते पाच लाखांपर्यंत असेल- तिसऱ्या प्राइस बँडमध्ये ५ ते १० लाख रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकाल- चौथ्या प्राईस बँडमध्ये १० ते २५ लाख रुपयांची गुंतवणूक असेल - शेवटचा प्लॅन हा २५ लाखांहून अधिक राहील
सरल पेन्शन योजनेच्या पॉलिसीची खरेदी केल्यावर सहा महिन्यांनंतर कंपनीकडून या पॉलिसीवर कर्जाची सुविधा मिळू शकते. कर्जाच्या रकमेचे निर्धारण तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनच्या आधारावर केले जाईल. तसेच जर गंभीर आजारांमुळे पॉलिसी सरेंडर केली तर कंपनी एकूण फंड अँड व्हॅल्यूच्या रकमेच्या ९५ टक्के रक्कम दिली जाईल. साधारण १० लाख रुपयांची रक्कम असेल तर ९.५ लाख रुपये मिळतील.