शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठमोळे मनोज नरवणे आजपासून लष्करप्रमुखपदाची सांभाळणार धुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 9:31 AM

आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

नवी दिल्ली: जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार सांभाळणार आहेत. सध्या लष्करप्रमुखपदी असलेल्या बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे सैन्यातील एक अनुभवी अधिकारी होते. बिपीन रावत आज सेवानिवृत्त होणार असून मनोज नरवणे लष्करप्रमुखपदाची धुरा सांभाळणार आहेत.

सप्टेंबर २०१८ मध्ये मनोज नरवणेंकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. लष्कराच्या दृष्टीनं पूर्व मुख्यालयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चीनला लागून असलेल्या जवळपास ४ हजार किलोमीटर सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्व मुख्यालयाकडे असते. त्यामुळे या पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासूनच नरवणेंचं नाव लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत होतं. 

आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जवळपास सर्वच परिस्थितींमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येच्या राज्यांमधील आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं यशस्वी नेतृत्त्व त्यांनी केलं आहे. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पथकातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. याशिवाय म्यानमारमधील दूतावासातही त्यांनी तीन वर्ष महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 

नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण 'ज्ञानप्रबोधिनी'त झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून १९८० '७ सीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात रूजू झाले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी ठसा उमटवला.

युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव नरवणेंना आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेBipin Rawatबिपीन रावत