भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी शनिवारी पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एचएस पनाग यांचा एक लेख समोर आले आहे. त्या लेखात दावा करण्यात आला आहे की, 6 जून रोजी होणाऱ्या चर्चेत चीन मोठी मागणी करेल. भारतातील पूर्व लडाखच्या तीन वेगवेगळ्या भागात सुमारे 40 ते 60 चौरस किलोमीटर क्षेत्रात चीननं आतापर्यंत घुसखोरी केली आहे. आता तो या चर्चेच्या माध्यमातून अशा कराराच्या अटी भारतासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल, ज्यास भारत कधीही सहमत होणार नाही. जर भारत या अटींशी सहमत झाला नाही, तर चीन मर्यादित युद्धही करू शकेल, असाही दावा त्यांनी लेखातून केला आहे. तो लेख काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. राहुल गांधी यांनी पनाग यांचा लेख केला शेअर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अन् खासदार राहुल गांधी यांनी एका सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरलचा हा लेख ट्विट केला आहे. राहुल यांनी लिहिले आहे की, 'सर्व देशभक्तांनी जनरल पनाग यांचा लेख जरूर वाचला पाहिजे.' त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लेखाची एक ओळ अधोरेखित केली आहे- 'नकार हे कोणतंही समाधान नाही. जनरल पनाग यांनी 2014मध्ये आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील झाले. अभिनेत्री गुल पनाग यांचे ते वडील आहेत.चीनचं वजन भारी: पनागचीन या चर्चेत भारतीय सीमेवरील पायाभूत सुविधांचे बांधकाम थांबविण्यासारख्या कठोर अटी घालू शकते. त्यांनी लिहिले की, "मुत्सद्देगिरी अयशस्वी ठरल्यास चीन सीमा संघर्ष वाढवेल किंवा मर्यादित युद्ध लढायलाही तयार असेल." ते पुढे म्हणतात की, चीनने भारताच्या मनमानीपुढे कधीही झुकणार नाही. त्यामुळे मग त्याच्या बाजूनं लादलेले युद्ध लढावे लागेल.
हेही वाचा
Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा
मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत
संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा