ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - सुरांना कोणत्या भाषेचं, जातीचं, धर्माचं अगदी कोणत्याही सीमेचं बंधन नसतात असं म्हणतात. पाकिस्तानची गायिका नाझिया अमिन मोहम्मद हिने हेच पुन्हा एकदा सिद्ध केलंय. नाझिया हिने चक्क मराठी गाणं गायलंय.
प्रसीद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं जोगवा चित्रपटातील ‘जीव दंगला रंगला’ हे प्रसिद्ध गाणं तिनं गायलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध चांगले व्हावेत हा त्यांचा उद्देश होता. ‘भारतातील आणि जगभरातील मराठी रसिकांसाठी उर्दू भाषिक पाकिस्तानींकडून ही सप्रेम भेट आहे असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
पाकिस्तान...जिथे उर्दू आणि हिंदी भाषा बोलली जाते. तिथल्या लोकांना आपली मराठी भाषा माहिती असणं किंवा ती बोलता येणं तसं अशक्यच. पण पाकिस्तानी गायिका नाझिया अमिन मोहम्मद हिने मात्र ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.
भारतातल्या मराठी रसिकांसाठी तिने खास मराठी भाषेतलं प्रेमगीत गायलं आहे’ याचा व्हिडिओदेखील नाझियाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केलाय. जीव रंगला हे गाणं तिने इतकं उत्तम गायलं आहे की एका पाकिस्तानी गायिकेने ते गाणं गायलं आहे हे ऐकूनही खरं वाटत नाही.
कराचीमध्ये राहत असेल्या नाझियाने हा व्हिडिओ अपलोड करुन अनेकांची मनं जिंकली आहे.