लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : निवासासाठी उत्तम असलेल्या देशातील १११ शहरांच्या यादीत महाराष्ट्राने बाजी मारली असून, राज्यातील ११ शहरांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. पहिल्या क्रमांकावर बंगळुरू शहर असून, दुसऱ्या स्थानी पुणे आहे. याशिवाय पहिल्या दहांत नवी मुंबई आणि मुंबई या शहरांचाही समावेश आहे. नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर या शहरांमधील जगणेही सुसह्य आहे.
भारतासारख्या देशात जगण्यासाठी सुसह्य ठरतील अशा शहरांची यादी तयार करणे म्हणजे कठीण काम. मात्र, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे दरवर्षी अशा शहरांची यादी तयार केली जाते. २०२० या वर्षासाठीचा ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स अर्थात निवासासाठी उत्तम असलेल्या शहरांचा निर्देशांक गुरुवारी जाहीर झाला. या यादीत राज्यातील ११ शहरांचा समावेश आहे.
राहण्यासाठी उत्तम असलेल्या शहरांच्या यादीत राज्याची ११ शहरेनाशिक ५१.२९ वसई-विरार ५१.२६ ठाणे ५८.१६ कल्याण-डोंबिवली ५७.७१ पिंपरी-चिंचवड ५७.१६
जगण्यासाठी अजिबात चांगली नसलेली शहरेn बरेली n धनबाद n श्रीनगर