मुसळधार पावसाचा कहर : टमाटरच्या शेतीचेही नुकसानसेवाग्राम : मंगळवारी दुपारपासून सेवाग्राम परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे झाडांच्या फांद्या वीजतआरांवर पडून तीन ठिकाणी तारा तुटल्या. परिणामी येथील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. दुपारी तारांची जोडणी करून वीज प्रवाह सुरळीत करण्यात आला. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. आठवडाभरापासून ढगाळ वातावरण तयार होऊनही पावसाचा पत्ता नव्हता. मंगळवारी दुपारनंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे आश्रम परिसरातील आनंद निकेतन कॉलनीमध्ये चिंचेच्या झाडाची फांदी तारावर पडल्याने वीज तारा तुटल्या. तसेच म्हाडा कॉलनीमध्येही झाड उन्मळून पडले. वरूड (रेल्वे) परिसरातही झाडांच्या फांद्यामुळे वीज तारा तुटल्याने सर्वत्र काळोख तयार झाला होता. परिसरातील टोमॅटो पिकाचेही यामुळे मोठे नुकसान झाले.(वार्ताहर)
वीज तारा तुटल्याने काळोख
By admin | Published: September 15, 2016 1:09 AM