शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

'हे मोहम्मद बिन तुघलकसारखे...'; NCERT'चा प्रस्ताव आणि ED छाप्यावरुन ममता बॅनर्जी भाजपवर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 4:45 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनसीईआरटी समितीने इंडिया ऐवजी भारत नावाच्या प्रस्तावावर भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी ईडी छापे आणि एनसीईआरटीच्या शिफारशींसह अनेक मुद्द्यांवर भाजपला लक्ष्य केले. 

संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रांना पाठवले समन्स; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "भाजप निवडणुकीपूर्वी देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी छापे टाकून एक घाणेरडा खेळ खेळत आहे." एकाही भाजप नेत्याच्या घरावर छापा टाकला का, असा माझा प्रश्न आहे. खरे तर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. याशिवाय नोव्हेंबरमध्ये तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. त्याचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे. 

गुरुवारीच कोट्यवधी रुपयांच्या कथित रेशन वितरण प्रकरणात ईडीने पश्चिम बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावर छापा टाकला.

राजस्थानमधील कथित परीक्षा पेपर लीक प्रकरणात मनी लाँड्रिंग संदर्भात जयपूर आणि सीकरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या आवारात छापे टाकले. याशिवाय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाला परकीय चलन उल्लंघन प्रकरणी समन्स बजावण्यात आले होते.

शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये 'इंडिया'चे नाव बदलून 'भारत' करण्याच्या NCERT समितीच्या शिफारशीवर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही गोष्ट अचानक का केली जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, भाजप मोहम्मद बिन तुघलकसारखा झाला आहे ज्याला इतिहास बदलायचा आहे.

बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला 'सबका साथ सबका विकास' हवा आहे, पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ 'सबका साथ सबका विनाश' आहे. विश्वभारती हे टागोरांचे योगदान आहे, तरीही विद्यापीठाला युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्यावर फलकांमध्ये त्यांचा उल्लेख नाही, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा