अमर्याद वाळू उपसा उठला जिवावर गिरणा पात्रातील घटना : रामदास बुडत असताना ते पळाले
By admin | Published: August 08, 2016 12:36 AM
जळगाव: अमर्याद वाळू उपशामुळे खड्डयात पाय घसरुन पडल्याने रामदास श्रीराम गवळे (कोळी) (वय २० रा.खेडी ता.एरंडोल) या तरुणाचा रविवारी दुपारी एक वाजता बुडून मृत्यू झाला. ही घटना धानोरा येथे गिरणा नदी पात्रात घडली. रामदास पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावरही वाळू ठेक्यावरील कामगारांनी त्याला वाचविण्यासाठी मदत न करता घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी दोन पोकलॅँड व झोपड्यांची जाळपोळ केली. ठेकेदाराचे कार्यालयही जाळून टाकण्यात आले.
जळगाव: अमर्याद वाळू उपशामुळे खड्डयात पाय घसरुन पडल्याने रामदास श्रीराम गवळे (कोळी) (वय २० रा.खेडी ता.एरंडोल) या तरुणाचा रविवारी दुपारी एक वाजता बुडून मृत्यू झाला. ही घटना धानोरा येथे गिरणा नदी पात्रात घडली. रामदास पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावरही वाळू ठेक्यावरील कामगारांनी त्याला वाचविण्यासाठी मदत न करता घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी दोन पोकलॅँड व झोपड्यांची जाळपोळ केली. ठेकेदाराचे कार्यालयही जाळून टाकण्यात आले.रामदास हा आतेभावाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात होता. गिरणा नदी पात्रात ३५ ते ४० फुट असलेल्या खड्डयात त्याचा पाय घसरला. घटनास्थळी उपस्थित पंढरीनाथ सोनवणे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तेथे उपस्थित गावकर्यांच्या मदतीने त्याला काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. दुपारी एक वाजेपासून त्याचा पाण्यात शोध सुरु होता. संध्याकाळी साडे पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला. यावेळी मृतदेह नेण्यास नातेवाईकांनी विरोध केला होता, मात्र समजूत काढल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.