नवी दिल्ली - गभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल 960 जण बेरोजगार होणार असल्याची माहिती मिळत आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्प.ची प्रोफेशनल नेटवर्किंग साईट असणाऱ्या लिंक्डइन (LinkedIn) ने त्यांच्या 960 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनकडून जगभरातील त्यांच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रिक्रूटमेंट प्रोडक्ट्सची मागणी कमी झाली आहे. अनेक कंपन्या LinkedIn चा वापर योग्य उमेदवाराचा शोध घेण्यासाठी करतात, तर उमेदवार या प्लॅटफॉर्मचा वापर नवीन नोकरी शोधण्यासाठी करतात. सेल्स आणि हायरिंग डिव्हिजनधील कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कंपनीने आपल्या वेबसाईटवर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान रॉसलान्सकी (Ryan Roslansky) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 आठवड्यांचा पगार देण्यात येईल. त्याचप्रमाणे अमेरिकेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वर्षाअखेर पर्यंत आरोग्य विम्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरीवरुन कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना या आठवड्यात याबाबत माहिती दिली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...
पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू
...म्हणून दर 6 महिन्यांनी होणार आता सिमकार्ड व्हेरिफिकेशन, जाणून घ्या नवा नियम
CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी
CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल