नवी दिल्ली : फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंट्सला आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान याविषयीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, यासंबंधी प्रकरणाची सुनावणी मद्रास हायकोर्टात व्हावी, अशी याचिका तामिळनाडू सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टात केली आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सना आधार कार्ड लिंक केले पाहिजे. यामुळे सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपत्तीजनक पोस्ट करणाऱ्यांची ओळख लगेच मिळू शकेल. तसेच, अशा पोस्ट करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करता येईल, असे याचिकेत म्हटले आहे. 20 ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर केंद्र सरकार, गुगल, ट्विटर आणि युट्यूबला नोटीस पाठवून हायकोर्टात प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात हस्तांतर करण्यासाठी उत्तर मागविले होते.
मद्रास हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान तामिळनाडू राज्याचे महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी दहशतवाद आणि पॉर्नोग्राफीसह गुन्हेगारी या मुद्द्यांचा हवाला दिला. तर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने सुप्रीम कोर्टात सांगितले की, जर गुन्हेगार चौकशीत मदत करण्यासाठी तपास यंत्रणांना डेटा आणि माहिती गोळा करण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकते.