नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आनंदाची माहिती दिली आहे. देशातील सिंहांची संख्या वाढली आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आनंद व्यक्त करत याबाबत माहिती दिली आहे. जगभरात सिंहांची संख्या कमी होत असताना ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. सिंहांची संख्या 29 टक्क्यांनी वाढल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी सिंहांचे काही फोटोही ट्विट केले आहेत.
'गुजरातच्या गीर वन्यजीव अभयारण्यात आशियाई सिंहांची संख्या 29 टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. सिंहांच्या जगण्याची टक्केवारीत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे' असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे. तसेच या कामगिरीबद्दल त्यांनी गुजरातमधील लोकांचं कौतुक देखील केलं आहे. गुजरातने गीरच्या जंगलात सिंहांच्या संरक्षणात मोठे यश मिळविले आहे. गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान राहिले आहे.
दक्षिण आफ्रिके व्यतिरिक्त गीर नॅशनल पार्क हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जेथे आशियाई सिंहाची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोकांच्या योगदान, तंत्रज्ञानाचा वापर, वन्यजीवांची काळजी आणि त्यांच्या योग्य वास्तव्याच्या व्यवस्थापनाचा हा परिणाम आहे. पुढे देखील सिंहांची संख्या अशी वाढत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
जगप्रसिद्ध गीर वन्यजीव अभयारण्यात दर पाच वर्षांनी होणारी सिंहांची शिरगणती कोरोना साथीमुळे टळली असून, त्याऐवजी सिंहांच्या संख्येबाबतचा ‘अंदाज अभ्यास’ वन विभागाने केला आहे. यात थेट गणना न करता काही ठोकताळ्यांनुसार सिंहांची संख्या ठरविण्यात आली. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, 5 व 6 जूनच्या मधल्या रात्री पौर्णिमेला अंदाज अभ्यास करण्यात आला. यात सिंहांच्या संख्येबाबत अंदाज बांधण्यात आला. हा आकडा जाहीर मात्र केला जाणार नाही. याआधीची सिंह गणना 2015 मध्ये झाली होती. गीरमध्ये 523 सिंह त्यावेळी आढळले होते.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा
Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च