पाटणा - बिहार सरकारने पहिल्यांदा मद्यपींना दंडात्मक कारवाई करून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मात्र मद्यपान केल्यानंतर पकडली गेलेली व्यक्ती पहिल्यांदा पकडली गेली आहे की, दुसऱ्यांदा, हे कसे कळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मात्र मद्यपान प्रतिबंधक विभागाने याच्यासाठीही आधीपासूनच रणनीती आखून ठेवली आहे. मद्यपान केलेली कुठलीही व्यक्ती सापडली तर त्याने पहिल्यांदा मद्यपान केले आहे की दुसऱ्यांदा हे त्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या निशाणीवरून निश्चित होईल.
याबाबत मद्यपान करताना पकडला गेल्यावर सर्व आरोपींचा पूर्ण रेकॉर्ड ठेवला जाईल. त्यासाठी एक खास पद्धतीचा सॉफ्टवेअर विकसित केला गेला आहे. मंत्रिमंडळ सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार जी व्यक्ती मद्यपान करताना पकडली गेल्यावर पोलीस आणि मद्यविभागाच्या टीमकडून त्या व्यक्तीचा आधार नोंदणी क्रमांक आणि अंगठ्याचं निषाण म्हणजेच थम्ब इम्प्रेशन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये नोंद करून घेईल त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केली जात आहे.
सॉफ्टवेअरमध्ये नोंद आकड्यांच्या आधारावर पकडलेल्या लोकांची ओळख पटवली जाईल. जर ही खूण आधीपासून नोंद असेल, तर ती व्यक्ती आधीही मद्यपान करताना पकडली गेली असल्याचे समजेल. पकडण्यात आलेल्या व्यक्तीने पहिल्यांदा मद्यपान केले आहे की, दुसऱ्यांदा याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पत्त्याचे ठाण्यामधूनही व्हेरिफिकेशन केले जाईल.
तेथील ठाण्यामध्ये जर त्याची सीडी क्लिप तयार झाली असेल. तर त्याची माहिती त्याला जेथून पकडले आहे त्या पोलीस ठाण्याला ही माहिती दिली जाईल. अशा परिस्थितीत मद्यपान करून तुम्ही पहिल्यांदा पकडे गेलात तर भविष्यात तुमच्यासाठी खूप अडचणी निर्माण होतील. मात्र पहिल्यांदा मद्यपान करताना पकडले गेलात तर तुम्ही तुरुंगात जाणार की नाही हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. केवळ दंडात्मक कारवाईवर भागणार नाही. तर मॅजिस्ट्रेट तुम्हाला तुरुंगातही पाठवू शकतात.