पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दोन दिवसांपूर्वी झालेल्या गुप्त भेटीने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. प्रशांत किशोर पुन्हा जेडीयूमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नितीश यांच्या भेटीवर प्रशांत किशोर यांनी गुरुवारी मौन सोडले. प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार यांच्यासोबतची भेट हा “सामाजिक-राजकीय शिष्टाचार” म्हणून पाहिला पाहिजे. यासोबतच प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांसमोर दारुबंदीवर आपले मत मांडले असून त्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशांत किशोर यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून मला नितीश यांना वैयक्तिकरित्या भेटायचे होते, परंतु वेळेच्या व्यग्रतेमुळे ते शक्य झाले नाही. 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीला ते जन सुरज अभियानांतर्गत बिहारमध्ये पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेअंतर्गत मी राज्यभर फिरणार असल्याचे पीकेंनी सांगितले. सुमारे एक वर्ष मी बिहारच्या विविध गावांमध्ये आणि ब्लॉकमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे, असेही पीके म्हणाले.
दारुबंदीवर धोरण पूर्णपणे फसले बिहारमध्ये दारुबंदी धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले. भ्रष्टाचारामुळे ते केवळ कागदावरच दिसत आहे. हे धोरण महिलांच्या भल्यासाठी आणले होते, मात्र महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. कारण दारुमुळे महिलांचे पती तुरुंगाची हवा खात आहेत. सीएम नितीश कुमार यांनी बंदीबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे, असेही पीके म्हणाले.
भेटीवर नितीश कुमार काय म्हणालेएक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीला परस्पर संबंध असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी पीकेसोबत येण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले होते की, हा प्रश्न त्यांना (प्रशांत) विचारला पाहिजे. जुन्या सहकाऱ्यांना भेटायला हरकत नाही, पण त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही, असेही नितीश म्हणाले होते.